टिओडी मराठी, दि. 25 जुलै 2021 – एकीकडे टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदरी निराशा पडत आहे. तर, दुसरीकडे खेळाडू पदक जिंकण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. हंगेरी इथे सुरु असलेल्या वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये भारताने यश संपादन केलं आहे. भारताची महिला कुस्तीपटू प्रिया मलिकने या स्पर्धेत 75 किलोग्राम वजन गटात सुवर्णपदक पटकावलं आहे. याबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
प्रियाने बेलारूसच्या कुस्तीपटूला 5-0 च्या फरकाने पराभूत करत हे सुवर्णपदक मिळवलंय. प्रियाने 2019 मध्ये पुण्यामध्ये खेलो इंडियामध्येही सुवर्ण पदक पटकावले होतं.
त्याचवर्षी 2019 मध्ये दिल्लीत 17 व्या स्कूल गेम्समध्येही तिने सुवर्ण पदक जिंकलं आहे. 2020 मध्ये पाटणा इथल्या नॅशनल कॅडेट चॅम्पियनशिपमध्येही तिने सुवर्णपदक मिळवलंय.
#WrestleBudapest WW 73kg medal bouts results
🥇PRIYA 🇮🇳 df Kseniya PATAPOVICH 🇧🇾, 5-0
🥉Lillian FREITAS 🇺🇸 df Bukrenaz SERT 🇹🇷, 4-0
🥉Mariia AKULINCHEVA 🇷🇺 df Veronika NYIKOS 🇭🇺, via fall— United World Wrestling (@wrestling) July 22, 2021
हरियाणाच्या क्रीडामंत्र्याकडून अभिनंदन :
प्रिया मलिकच्या या यशाबद्दल हरियाणाचे क्रीडामंत्री संदीप सिंग यांनी ट्विट करत तिचे अभिनंदन केलं आहे.
त्यांनी असं लिहिलंय, महिला कुस्तीपटू प्रिया मलिक, हरियाणाची सुपुत्रीने हंगेरीच्या बुडापेस्टमध्ये आयोजित वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवल्याने तिचे अभिनंदन.
congratulations to the wrestler daughter Priya Malik of Haryana for winning the gold medal in the 73 kg category of the World Cadet Wrestling Championship in Budapest, Hungary. pic.twitter.com/cGVTvmfTUF
— Sandeep Singh (@flickersingh) July 25, 2021