TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 25 जुलै 2021 – बॉक्सर मेरी कोमने 51 किलो वजनी गटामध्ये डॉमनिकन रिपब्लिकच्या मिग्यूएलिना गार्सियावर 4-1 असा सहज विजय मिळवून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या दोन राऊंडनंतर गुणतालिका 19-19 अशाप्रकारे समसमान होती, परंतु त्यानंतर 38 वर्षीय मेरीने सर्व अनुभव पणाला लावला अन् प्रतिस्पर्धीला गार केले.

टेबलटेनिसपटू मनिका बात्रा हिने दमदार पुनरागमन करताना मिळवलेला विजय हा लक्षवेधी ठरला आहे. यूक्रेनच्या मार्गारिटा पेसोत्स्काने पहिले दोन गेम सहज जिंकले. त्यामुळे मनिकाचे कमबॅक अशक्य वाटत होते.

मार्गारिटाने 11-4, 11-4 असा गेम जिंकून 2-0 अशी घेतलेली आघाडी मनिकाला गाठणे आव्हानात्मक होते, परंतु तिने तिसऱ्या खेळात 11-7 असा विजय मिळवत सामन्यातील चुरस वाढवली.

चौथ्या खेळात कमालीचा संघर्ष पाहायला मिळाला. 11 मिनिट चाललेल्या या सामन्यात मनिकानं 12-10 अशा विजयासह सामना 2-2 असा बरोबरीत आणला.

मनिकाचा हा कमबॅक पाहून युक्रेनची खेळाडू गोंधळली. पण, पाचवा गेम 11-8 असा घेत तिने देखील आव्हान दिले. सहाव्या गेममध्ये मनिका 2-5 अशी पिछाडीवर होती.

तिनं सलग 9 गुण घेत हा खळे 11-5 असा करून सामना 3-3 असा बरोबरीत आणला. सातव्या गेममध्ये मनिकाने 7 मिनिटांत युक्रेनच्या खेळाडूवर 11-7 असा विजय मिळवूत 4-3 अशी बाजी मारली आहे.