TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 13 जून 2021 – कोणाचं नशीब कधी आणि कोणत्या गोष्टीने बदलेल हे सांगता येत नाही. कुणाला लॉटरी लागेल किंवा कुणाला हिरा सापडेल. तर, कुणाला सर्वसामान्य वाटणाऱ्या गोष्टीत काहीतरी गूढ लपलेलं आढळेल. अमेरिकेमध्ये 20 डॉलर म्हणजेच अवघ्या 1400 रुपयांच्या नाण्यांसाठी सुमारे 138 कोटी रुपयांची बोली लागली आणि नशीब बदललं.

न्यूयॉर्कमध्ये 1933 सालच्या डबल इगल सोन्याच्या नाण्याचा लिलाव झाला. या नाण्याच्या लिलावाने आतापर्यंत सर्व रेकॉर्ड तोडलेत. या अत्यंत साधारण दिसणाऱया खास नाण्याची 18.9 मिलियन डॉलर म्हणजेच सुमार 138 कोटींमध्ये विक्री झाली.

या डबल इगल सोन्याच्या नाण्यासह जगातील सर्वात दुर्लभ तिकिटांचीहि 60 कोटी रुपयांत विक्री झालीय. स्टुअर्ट विट्समॅन यांनी हे नाणं विकलं गेलं आहे.

2002 मध्ये त्यांनी हे नाणं 55 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. या नाण्याची 73 ते 100 कोटी दरम्यान बोली लागेल, अशी त्यांना वाटत होतं.