TOD Marathi

Google Chrome होणार अधिक सुरक्षित; Security वाढविली, Harmful डाऊनलोडपासून होणार बचाव

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 13 जून 2021 – जगातील कोटय़वधी इंटरनेट युजर वेब ब्राऊजर म्हणून गुगल क्रोमचा वापर करत असतात. क्रोम युजर्ससाठी आता चांगले वृत्त आहे. नुकतीच गुगल क्रोमची सिक्युरिटी आणखी वाढविली आहे. त्यामुळे हार्मफुल डाऊनलोडपासून युजरचा बचाव होणार आहे.

एखादी रिस्की फाईल डाऊनलोड करण्यावेळी अधिक प्रोटेक्शन ऑफर केले जाणार आहे. त्याशिवाय एका स्कॅनिंग टूलच्या मदतीने डाऊनलोडिंगच्या अगोदरच धोकादायक फाईलची सूचना युजरला मिळणार आहे. हे नवं फिचर enhanced safe browsing चा एक भाग असणार आहे.

सध्या युजर्ससाठी अनेक वेब ब्राऊजर उपलब्ध आहेत. मात्र, ते कितपत सुरक्षित आहेत? असा प्रश्न पडत आहे. काही वेब ब्राऊजर युजरची माहिती चोरत तर नाहीत ना ? असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे गुगलने सुरक्षितता वाढविण्यावर भर दिला आहे.