TOD Marathi

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय (CM Eknath Shinde Aannounced guardian ministers of all districts in Maharashtra) यादी जाहीर केली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis is guardian minister of six districts including Nagpur) हे नागपूरसह सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत तर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याकडे मुंबई शहर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपकडे 21 जिल्ह्यांचे पालकमंत्री पद देण्यात आले आहेत तर शिंदे गटाकडे 15 जिल्ह्यांचे पालकमंत्री पद देण्यात आली आहेत. एकनाथ शिंदे यांचा गृहजिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद शंभूराज देसाई यांच्याकडे देण्यात आलं आहे तर पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे.

● उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे

● राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,

● सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर, गोंदिया,

● चंद्रकांतदादा पाटील- पुणे

● विजयकुमार गावित- नंदुरबार

● गिरीश महाजन- धुळे, लातूर, नांदेड

● गुलाबराव पाटील – जळगाव, बुलढाणा

● दादा भुसे- नाशिक

● संजय राठोड- यवतमाळ, वाशिम

● सुरेश खाडे- सांगली

● संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

● उदय सामंत- रत्नागिरी, रायगड

● तानाजी सावंत- परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)

● रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग

● अब्दुल सत्तार- हिंगोली

● दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर

● अतुल सावे – जालना, बीड

● शंभूराज देसाई – सातारा, ठाणे

● मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर