TOD Marathi

देशात पहिल्यांदाच समुद्राच्या तळाशी अंडरग्राउंड बुलेट ट्रेन (Bullet Train Project) धावणार आहे. यासाठी देशात पहिल्यांदा समुद्रतळाशी बोगदा (Tunnel) उभारण्यात येणार आहे. समुद्राखाली बांधण्यात येणारा हा भुयारी मार्ग ७ किलोमीटर लांबीचा असणारा तर देशाचा पहिला समुद्र भुयारी मार्ग हा मुंबईमध्ये होणार आहे. बुलेट ट्रेनचा समुद्राखाली काढण्यात येणाऱ्या भुयारी मार्गासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील (Maharashtra) ठाणे (Thane) जिल्ह्यातील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा येथील भूमिगत स्थानकादरम्यान हा भुयारी मार्ग (Underground Tunnel) बांधण्यात येणार आहे. बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रमध्ये एकूण २१ किलोमीटरचा भुयारी मार्ग असेल त्यातला ७ किलोमीटरचा मार्ग समुद्राखालून जाईल. पारसिक हिलखाली ११४ मीटर खाली हा भुयारी मार्ग करण्यात येणार आहे.

NHSRCL च्या मते, हा समुद्री बोगदा १३.१ मीटर व्यासाचा आणि ‘सिंगल-ट्यूब ट्विन-ट्रॅक’ असेल. या विभागात बोगद्याला लागून असलेल्या ३७ ठिकाणी ३९ इन्स्ट्रुमेंट रूम बांधण्यात येणार आहेत. सुमारे १६ किमी लांबीचा बोगदा तयार करण्यासाठी तीन टनल बोरिंग मशीन (TBM) वापरण्यात येतील आणि उर्वरित पाच किलोमीटर मार्ग न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड (NATM) मशीनचा उपयोग करुन बांधला जाईल. हा बोगदा जमिनीच्या खाली सुमारे २५ ते ६५ मीटर खोल असेल. या बोगद्याचं सर्वात खोल बांधकाम शिळफाटाजवळ असेल. शिळफाटाजवळील पारसिक टेकडीच्या खाली ११४ मीटर असेल.