TOD Marathi

मुंबई: देशात कोरोना लसीकरणाचा १०० कोटीचा टप्पा पार करण्यात आलाय. तशी घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. कोरोना विरोधातील लढाईत भारताचं हे मोठं यश असल्याचा करण्यात येत आहे. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे दावे खोटे असल्याचा आरोप केलाय.

देशात १०० कोटी लसीकरण झाल्याचा दावा खोटा असल्याचं राऊतांनी म्हटलंय. देशात केवळ २३ कोटी लसी दिल्या गेल्याचा दावाही त्यांनी केलाय. इतकंच नाही ते पुराव्यासह सिद्ध करु, असंही राऊत म्हणाले आहेत. त्याच सोबत आर्यन खान प्रकरणी देखील त्यांनी ट्विट करून टीका केली आहे.

आर्यन खान प्रकरणी साक्षादाराला NCBनं कोऱ्या कागदावर सही करायला लावली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सध्या आर्यन खान प्रकरण चांगलेच चर्चेत आहे त्याच पार्श्वभूमीवर राज्यात राजकारण सुरू आहे.