Aryan Khan Case: गोसावीच्या बॉडीगार्डचे एनसीबीविरोधात खळबळजनक दावे!

मुंबई: केपी गोसावी यांचा बॉडीगार्ड प्रभाकर साळी यांनी ड्रग्ज संदर्भात एनसीबीविरोधात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी दखल घ्यावी, त्याच सोबत एसआयटी मार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी केली आहे.

समीर वानखेडे खोट्या केसेस बनवून लोकांना अडकवत आहेत. दहशत निर्माण करत आहेत. वसुली सुरू आहे हे मी आधीपासूनच सांगत आहे. आता त्यांचाच पंच समोर आला असून त्यानेच गौप्यस्फोट केले आहेत. याबाबत पोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांशी बोलणार. या शहरात ऑर्गनाईज क्राईम सुरू आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

या सर्व प्रकरणांची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी सुरू केली पाहिजे, असे मलिक यांनी सांगितलं त्याच सोबत परमबीर सिंग सारखे माणसं शहरात अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांना लगाम घातला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

Leave Your Comment