टिओडी मराठी, औरंगाबाद, दि. 22 जून 2021 – निजामाचा वंशज आहे, असे सांगून कृषी विद्यापीठातील कोट्यवधी रुपयांची जमीन 25 लाखात विकल्याचा प्रकार समोर आला आहे. अली खान ऊर्फ दिलशाद जहां असे जमीन विकणाऱ्याचे नाव आहे. याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दिलशाद ऊर्फ अली याने हिमायतबाग येथे 400 एकरवर दावा ठोकला आहे. बटाटे आणि कांद्याच्या शिक यांच्या आधारावर हा दावा त्याने केलाय.
भडकलगेट इथले शिक्षक मोहम्मद नदीम सलीम पाशा (वय 46) यांची हैदराबाद येथील नातेवाईकांच्या माध्यमातून दिलशाद आली खान ऊर्फ दिलशाद शहां सोबत ओळख झाली.
ओळखी त्याने आपण निजाम वंशज असल्याचे सांगितले होते. त्यानंतर दिलशादने हिमायतबाग येथे 400 एकर जमीन आमच्या नावे आहे, असे सांगितले. त्यानंतर त्याने व्हाट्सअपवर सर्व नदीम पाशा यांना कागदपत्रे पाठविली आणि 25 लाखात जमीन देण्याचे सांगितले. मोहम्मद पाशा यांनी होकार देऊन पैसेही दिले.
काही दिवसांनी रजिस्ट्री करण्यासाठी आग्रह धरला. दिलशाद जहां याने टाळाटाळ केली. नदीम पाशा यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यांनी 25 लाखाची रक्कम परत करण्यास तगादा लावला.
यावेळी कॉन्ट्रॅक्ट किलर मार्फत जीवे मारण्याची धमकी दिलशाद याने दिली. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून दिलशाद जहां विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्यास अटक केलीय.