TOD Marathi

महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) असताना त्या वेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) 18 महिने देखील मंत्रालयात गेले नाहीत. त्यांच्या दिरंगाई आणि निष्काळजीपणामुळे वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास उद्धव ठाकरे जबाबदार आहेत आणि आदित्य ठाकरे यांचे आंदोलन खोटारडे आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP Maharashtra President Chandrashekhar Bawankule) यांनी केली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

पुढे ते म्हणाले की आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाच्या (Vedanta Foxconn Project) विषयावरून तळेगाव येथे करत असलेले आंदोलन म्हणजे खोटारडेपणा आहे. हे आंदोलन म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट करून जनतेची दिशाभूल करणे आहे. आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प उभारण्यासाठी केलेला सामंजस्य करार दाखवा आणि त्या प्रकल्पाला तळेगावमध्ये नेमका कोणता भूखंड दिला त्याचा त्यांच्या सरकारच्या काळातील आदेश दाखवावा असं खुलं आव्हान चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule challenged Aditya Thackeray) यांनी दिले.