TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 24 ऑगस्ट – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महागात पडल आहे. या प्रकरणी नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची रवानगी आता पोलिस स्टेशनमध्येच होणार आहे. म्हणून नारायण राणे यांचा आज रात्रीचा मुक्काम पोलिस स्टेशनमध्येच असणार असे समजत आहे.

पोलिसांनी आज दुपारी केंद्रीय मंत्रीनारायण राणे यांना गोळवली येथून अटक केली. मात्र, या अगोदर नारायण राणे यांनी सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. पण, हा जामीन अर्ज फेटाळून लावल्यामुळे नारायण राणे यांना अटक करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली.

नारायण राणे यांनी अटक होऊ नये म्हणून उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे नारायण राणे यांचा मुक्काम आज रात्री पोलीस स्टेशनमध्ये होणार असे समजत आहे.

उच्च न्यायालयामध्ये नारायण राणे यांची याचिका तांत्रिक कारणामुळे दाखल होऊ शकली नाही. कारण गुन्हे दाखल केल्याची मूळ कागदपत्रे सोबत जोडल्या शिवाय न्यायालयाने याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला.
मात्र, उद्या सकाळी ही याचिका दाखल होईल असा अंदाज लावला जातोय.