TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 24 ऑगस्ट – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात हवामान करक वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी आज अटक केली. अटक करत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे जेवण करत होते, यावेळी पोलिसांनी कर्तव्य बजावत नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठून अटक केली. यावरून नारायण राणे समर्थक आक्रमक झाले असून निलेश राणे यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली.

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यामुळे राजकारणातील वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी उच्च न्यायालयामध्ये जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी नारायण राणे यांना अटक केली. पोलिसांचा नारायण राणे यांना अटक करतानाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये नारायण राणे जेवण करत असताना दिसत आहेत. यावेळी पोलिसांनी कर्तव्य बजावत नारायण राणे यांना अटक केली. नारायण राणे यांना अटक होऊ नये यासाठी त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते पोलिसांना अडवून धरत होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू होती. महाडमध्ये बोलत असताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अपशब्द वापरला होता. सकाळपासून ठिकाणी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजप कार्यालय फोडून काढली. नारायण राणे यांच्यावर ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला म्हणून पोलिसांनी त्यांना अटक केली.

रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांना ताब्यात घेतलं. आपल्या दोन्ही मुलांसोबत बंद खोलीत बसून होते. यावेळी पोलिसांचा फौजफाटा बाहेर उभा होता पोलीस अधिक्षकांनी नारायण राणे यांना सोबत येण्याची विनंती केली. पण,जेव्हा आतमध्ये मोठा गोंधळाला, त्याने पोलिसांना तुमच्याकडे अटक वॉरंट आहे का?असं म्हणत त्यांच्याशी हुज्जत घातली, यावेळी नारायण राणे जेवण करत होते. यावेळी पोलीस आणि कर्तव्य बजावत नारायण राणे यांना जेवणावरच्या ताटावरून उठून अटक केली.

त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं ब्लडप्रेशर आणि शुगर वाढली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे, असा सल्ला डॉक्टरांनी पोलिस अधीक्षकांना दिला. तर नारायण राणे यांना रत्नागिरी पोलीस आणि बेकायदेशीरपणे ताब्यात घेतला आहे तसेच त्यांच्या जिवाला धोका आहे असा आरोप भाजपचे नेते करत आहेत.