TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 14 जून 2021 – जगात बरेच देश कोरोनमुक्त झाले असले तरी भारत देश अजूनही कोरोनाचा सामना करत आहे. एकीकडे कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना तिसरी लाटेची तयारी केंद्र सरकारकडून सुरु केली आहे. केंद्र सरकार येत्या दोन ते तीन महिन्यात देशात 50 इनोव्हेटिव्ह मॉड्यूलर रुग्णालये सुरु करण्याचा विचार करत आहे.

एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, मूलभूत पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी हे मॉड्यूलर रुग्णालये बांधणार आहे. सध्याच्या रुग्णालयातील विद्यमान पायाभूत सुविधांचा भार कमी व्हावा, या हेतूने या मॉड्यूलर रुग्णालयांची बांधणी होणार आहे.

या रिपोर्टनुसार, आयसीच्या 100 बेड्ससोबत 50 मॉड्यूलर रुग्णालये तयार केले जाणार आहेत. तीन आठवड्यात बांधण्यात येणाऱ्या या रुग्णालयांना सुमारे 3 कोटींच्या आसपास खर्च होण्याचा अंदाज वर्तविला आहे.

येत्या 6 ते 7 आठवड्यामध्ये हे रुग्णालय पूर्णपणे कार्यरत होतील. यात पहिल्या टप्प्यात बिलासपूर, अमरावती, पुणे, जालना आणि मोहालीमध्ये 100 बेड्स मॉड्यूलर रुग्णालय बनणार आहे.

रायपूरमध्ये 20 बेड्सचं रुग्णालय बनेल. तर बंगळुरूमध्ये 20, 50 आणि 100 बेड्सचं एक- एक रुग्णालय तयार केले जाईल.

हि मॉड्यूलर रुग्णालय पुढचे 25 वर्षापर्यंत टिकू शकतात. तसेच एका आठवड्यापेक्षा कमी वेळेत नष्टही केले जाऊ शकतात आणि कुठंही घेऊन जाऊ शकतात.

देशाच्या विविध भागात कोविड -19 चे रुग्ण वाढल्याने रुग्णालयांमधील पायाभूत सुविधांवर प्रचंड दबाव होता. त्यामुळे मॉड्यूलर रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णालयांना एक प्रकारचा दिलासा मिळेल.

मॉड्यूलर रुग्णालय म्हणजे रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार आहे. आता विद्यमान रुग्णालयाच्या इमारती शेजारी ही रुग्णालयते बांधले जाऊ शकतात.