धक्कादायक! जगप्रसिद्ध मोनालिसा चित्रावर फेकला केक; व्हिडिओ पहा

व्हीलचेअरमध्ये बसलेली वृद्ध महिला असल्याचं भासवत एका माणसाने चक्क जगप्रसिद्ध मोनालिसाच्या चित्रावर केक फेकला आहे. या घटनेनंतर त्वरित या व्यक्तीला चित्रापासून दूर नेण्यात येऊन तत्काळ अटक करण्यात आली.

चित्राभोवती उभारण्यात आलेल्या प्रोटेक्टिव्ह ग्लासवर हा केक जाऊन आदळल्यानं चित्राला कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेले नाहीये. या काचेवर पांढऱ्या रंगाचं क्रीम पसरलं आहे.

केक फेकणाऱ्या माणसाने विग घातला होता, लिपस्टिक लावलं होतं. पृथ्वीचा विचार करा असा संदेश देत या माणसानं मोनालिसाच्या चित्राला केक फेकून मारला.
मोनालिसाचं चित्र पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. तेव्हाच व्हीलचेअरमध्ये बसलेली व्यक्ती चित्राजवळ केली, त्या बाईने चित्राला मारायला सुरुवात केली. सुरक्षारक्षकांनी 10-15 सेकंदात त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. रविवारी अचानक घडलेल्या या प्रकाराने सगळेच चक्रावून गेले.

 

Please follow and like us: