TOD Marathi

शालेय साहित्य महागले; दरवाढीमुळे पालकांच्या खिशाला कात्री

संबंधित बातम्या

No Post Found

अवघ्या काही दिवसांत नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहेत. शालेय साहित्याने बाजारपेठ सजली असून पालकही साहित्य खरेदीसाठी गर्दी करत आहेत. गतवर्षी पेक्षा यंदा शैक्षणिक साहित्य हे महागले असून त्यामध्ये दहा टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या पालकांच्या खिशाला दरवाढीमुळे कात्री लागली आहे.

वाढत्या महागाईमुळे पालक त्रस्त

कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दोन वर्ष ऑनलाइन शिक्षण सुरू होते. त्यावेळी दरवर्षीप्रमाणे शालेय साहित्याची विक्री झाली नाही. आता मात्र शालेय साहित्याला भरपूर मागणी आहे. वह्यांच्या निर्मितीसाठी कागदाचा दरांसह वाहतूक खर्च वाढला आहे. त्यासमवेत मजुरी, हमाली, वाहतूक यांसह अन्य खर्च वाढले आहेत. कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ आणि वाढलेला वाहतूक खर्च पाहता वह्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. वह्यांसह पेन, पेन्सिल, कंपास, स्कूलबॅग अशा शालेय साहित्याच्या किमतीतही वाढ झाल्याचे दिसून येते.

“शरद पवारांनी होळकरांच्या जमिनी ढापल्या अन्…”; पडळकरांचा गंभीर आरोप

राज्यातील महापालिकांची आरक्षण सोडत; इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली

धक्कादायक! जगप्रसिद्ध मोनालिसा चित्रावर फेकला केक; व्हिडिओ पहा

 

वाढलेल्या शालेय साहित्यांचे दर खालीलप्रमाणे –

वह्यांचे दर

दोनशे पानी वह्या – १५० ते ३०० रुपये डझन
A 4 साईज वह्या – २५० ते ६०० रुपये डझन,
शंभर पानी वह्या – १५० रुपये डझन,
दोनशे पेजीस लहान वह्या – ३०० रुपये
मोठ्या वह्या – ६०० रुपये डझन

दप्तरांचे दर

कापडावर जीएसटी लागू असल्याने दप्तराच्या किमतीतही भरमसाठ वाढ झाली आहे. बाजारात दप्तरांची किंमत अडीचशे ते आठशे रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

गणवेश दर

सरकारी खासगी व इंग्रजी माध्यमांचे गणवेश यांचे दर दर्जानुसार ठरतात. गतवर्षीपेक्षा गणवेशाच्या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे. शहरातील कापड दुकानात मराठी शाळांचे गणवेश तीनशे ते सहाशे रुपयांपर्यंत तर इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या गणवेशाचे जर किमान पाचशे ते अडीच हजार रुपयांपर्यंत आहेत.

इतर साहित्याचे दर

वॉटर बॅग ५० ते ३०० रुपये
कंपास पेटी ३० ते २०० रुपये
टिफिन बॉक्स ५० ते २५० रुपये
रेनकोट लहान मुले २०० – ५५० रुपये

गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने शालेय साहित्यात दरवाढ होत असल्याने पालकांचे बजेट कोलमडत आहे. त्यामुळे पालकांकडून सवलतीची मागणी विक्रेत्याकडे केली जाते. वाढत्या महागाईमुळे आवश्यक तेवढ्याच साहित्याची खरेदी करणार आहोत.