टिओडी मराठी, मुझफ्फरनगर, दि. 29 जून 2021 – कोरोनामुळे नागरिकांना औषधांचा काही प्रमाणात तुटवडा भासत आहे. मात्र, याचा गैरफायदा घेत औषधांचा एक बेकायदेशीर कारखाना उभारल्याचे उघडकीस आले आहे. आज उत्तर प्रदेशातील एका गावात औषधांचा एक बेकायदेशीर कारखाना असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.
याबाबत गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, औषध विभागाने बिलासपूर गावात छापा टाकला. या ठिकाणी औषधांसाठीचा कच्चा माल व लाखो रुपये किमतीची यंत्रसामग्री आढळली.
हे सर्व साहित्य जप्त केले असून न्यू मंडी पोलीस स्थानकात याबाबत प्रकरण दाखल केले आहे. औषध निरीक्षक लवकुश प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईदरम्यान या कारखान्यात तयार होणारी औषधे मीरत, कानपूर, बाघपत, लखनौ, गाझियाबाद, सहारणपूर आणि आग्रा येथे पुरवली जात होती.