TOD Marathi

टिओडी मराठी, लखनऊ, दि. 6 ऑगस्ट 2021 – येत्या काही महिन्यामध्ये उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे आता उत्तर प्रदेशामध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सध्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे. गृहमंत्री अमित शहा वारंवार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेताहेत. तर, दुसरीकडे काँग्रेस हि उत्तर प्रदेशातील स्थानिक पक्षांशी बोलणी सुरु केली आहे.

आगामी उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार आहेत. त्याचबरोबर पक्षाकडून त्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असणार आहेत, असे वक्तव्य काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व उत्तर प्रदेशचे प्रभारी राजेश तिवारी यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

उत्तर प्रदेशच्या जनतेला व काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्रीच्या रूपात पाहायचे आहे. त्यासाठी बूथ स्तरावर कार्यकर्त्यांना प्रशिक्षण हि दिलं जात आहे. तर आगामी उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार आहे, असे राजेश तिवारी यांनी म्हंटलं आहे.

तिवारी यांच्या या वक्तव्यानंतर उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मागील 2 वर्षापासून प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशामध्ये अनेकदा दौरे केलं आहे.

घटनांचा त्या वेळोवेळी पाठपुरावा करताना दिसत असतात. त्यामुळे प्रियंका गांधी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत उभा राहिल्या तर भाजपसाठी त्या मोठी डोकेदुखी ठरणार आहे.