TOD Marathi

Big Hacking Rewards ; ‘या’ कंपनीने हॅकरलाच दिली Security Consultant ची नोकरी

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 22 ऑगस्ट 2021 – मागील आठवड्यात क्रिप्टोकरन्सीच्या इतिहासातील सर्वात मोठी चोरी झाली होती आणि त्या चोरीचे मोठे बक्षीस संबंधित हॅकरला दिले आहे.

पॉली नेटवर्क या क्रिप्टोकरन्सी ट्रान्स्फर सेवा देणाऱ्या कंपनीमध्ये सायबर घुसखोरी करून सुमारे ४५०० कोटी डॉलर्सची क्रिप्टोकरन्सी हॅकर्सनी लंपास केली होती. आता कंपनीने त्या हॅकरलाच कंपनीमध्ये नोकरी देऊन त्याची सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक केलीय.

या कंपनीने या हॅकरचे नाव ‘व्हाईट हॅट’ असे सांगितले असले तरी हे नाव खोटे आहे. पण, कंपनीच्या म्हणण्यानुसार, या हॅकरचे कौशल्य वादातीत आहे. त्यामुळेच त्याला एथिकल हॅकर म्हणून कंपनीत महत्वाची जबाबदारी दिली आहे. कंपनीत काय उणीवा आहेत? याची माहिती या नव्या सुरक्षा सल्लागाराकडून कंपनीला मिळाली आहे, असे सांगितले जात आहे.

या हॅकिंगमध्ये हॅकर्सनी २६.९ कोटी डॉलर्स किमतीचे इथेरीयम आणि ८.४ कोटी डॉलर्सचे पॉलीगॉन अशा दोन क्रिप्टोकरन्सी लंपास केल्या होत्या. त्यातील १९३० कोटी डॉलर्सचे चलन दुसरे दिवशी कंपनीला परत केले होते.

या कंपनीने या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार मि.व्हाईट हॅट या हॅकिंगसाठी कायदेशीर जबाबदार नाही आणि हॅकर्स चोरलेले पैसे परत करतील, असे म्हटले आहे.