टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 22 ऑगस्ट 2021 – आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी इन्फोसिसकडे आयकर विभागाच्या नवीन वेबसाईटचे काम दिले आहे. पण, इन्फोसिसकडून अजून तांत्रिक अडचणी दूर केल्या नसल्याचे सांगितले जात आहे. भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने या पार्श्वभूमीवर देशातील मोठी तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसचे एमडी आणि सीईओ सलील पारेख यांना समन्स जारी केलं आहे.
आयकर विभागाने करदात्यांना कर भरण्यास अधिक सोपे आणि सुलभ व्हावे म्हणून नवीन वेबसाइट सुरू केली. त्यानंतर या वेबसाइटमध्ये अनेकविध तांत्रिक अडचणी आल्या.
आयकर विभागाची नवीन ई-फायलिंग पोर्टल सेवा मागील अडीच महिन्यांपासून सुरू झाली आहे. पण, त्यातील तांत्रिक दोष अद्यापही दूर झाले नाहीत. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना इन्फोसिसचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांनी २३ ऑगस्ट २०२१ रोजी स्पष्टीकरण द्यावे, असे समन्स बजावले आहे.
अनेक समस्या आयकर विभागाच्या नवीन ई-फायलिंग पोर्टलमध्ये येताहेत. आयकर रिटर्न्स भरणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ते करदात्यांची समस्या समजून घ्यावे. आयकर विभागाच्या या ई-फाईलिंग पोर्टलचे काम सुरळीत होत नाही, त्यामुळे त्यांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे म्हटले आहे.