TOD Marathi

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) कधी काय बोलतील याचा नेम नाही. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल महोदयांनी महाराजांची तुलना थेट नितीन गडकरींसोबत केली (The Governor, who made controversial statements on Chhatrapati Shivaji Maharaj, Savitribai Phule, directly compared Maharaj with Nitin Gadkari) आणि नव्या वादाला तोंड फुटलं.

भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असणार नावं. मात्र या राज्यपालांचा राजकीय इतिहास पाहिला तर तोही बराच वादळी राहिलाय.

भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे मुळ उत्तराखंडचे (Uttarakhand) आहेत. लहानपणापासून त्ये संघाचे कट्टर स्वयंसेवक होते. इंग्रजी विषयात मास्टर्स केलेले भगतसिंह कोश्यारी कॉलेज जीवनापासूनच विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून राजकारणात आले. कॉलेजचे जीएस, विद्यापीठाचे विद्यार्थी प्रतिनिधी अशी वेगवेगळी पदे गाजवली (Bhagatsingh Koshyari, who has master’s in English, entered politics through the student union right from his college life. He held various posts like GS of the college, student representative of the university).

याच दरम्यान त्यांचा जनसंघाकडे असणारा ओढा वाढू लागला. जनसंघाचं काम ते निष्ठेने करू लागले. यानंतर इतिहासातील सर्वात वादळी ठरलेला आणीबाणीचा काळ आला. यात संघाच्या इतर नेत्यांसोबत कोश्यारीदेखील आंदोलनात सहभागी झाले आणि जेलच्या वाऱ्या देखील केल्या.

यानंतर कोश्यारी यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला आणि सोबत संघाचं काम निष्ठेने करतच राहिले. पाहता पाहता बरीच वर्ष निघून गेली. १९९७ साली भाजपची उत्तर प्रदेशात सत्ता आली. कल्याणसिंह यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली तेव्हा अनेक कार्यकर्त्यांना सरकारात सामील होण्याची संधी मिळाली होती. यात भगतसिंह कोश्यारी हेही होते.

कोश्यारी सर्वात पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते, ते शिक्षक मतदारसंघातून. हे कदाचित फार कमी लोकांना माहिती असेल. मात्र यानंतर २००० साली उत्तर प्रदेशात अशी एक गोष्ट घडली ज्यामुळे भगतसिंह कोश्यारींच्या आयुष्याला थेट यू टर्न मिळून गेला.

2000 साली वाजपेयी सरकारने उत्तर प्रदेश राज्याचे दोन भाग केले आणि उत्तराखंड नावाच्या नव्या राज्याची स्थापना केली. नित्यानंद स्वामी यांना या नव्या राज्याचे मुख्यमंत्री बनवण्यात आलं.

आमदार असलेल्या भगतसिंह कोश्यारींची मात्र याकाळात लॉटरी लागली आणि त्यांना थेट मंत्रीपद मिळून गेलं. यानंतर मात्र भगतसिंह कोश्यारी यांच्या राजकारणाला भरारी आली. साधारण वर्षभर नित्यानंद स्वामी पदावर राहिल्यावर भगतसिंह कोश्यारी यांना मुख्यमंत्री करण्यात आलं (Bhagatsinh Koshyari was made Chief Minister after Nityananda Swamy remained in office).

मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आलेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. यावेळी पहिल्यांदाच विधानसभेत निवडून आलेले भगतसिंह कोश्यारी विरोधी पक्षनेते बनले. यानंतर उत्तराखंडवर अनेकवेळा भाजपची सत्ता आली मात्र कोश्यारींना काही मुख्यमंत्री पदी बसता आलं नाही.

अशातच राजकारणातील वैयक्तिक प्रगती होत असताना त्यांचं वय मात्र वाढलं होतं. अशातच नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एक निर्णय घेत ७५ वर्ष पूर्ण झालेल्या नेत्यांना राजकारणातून संन्यास घ्यायला लावला आणि अर्थात यात भगतसिंह कोश्यारी यांनाही राजकारणातून संन्यास घ्यावा लागला पण शाखेच्या तालमीत वाढलेल्या कोश्यारी यांनी हा निर्णय गोड मानून घेतला. त्यानंतर त्यांना थेट राज्यपाल म्हणून महाराष्ट्रात पाठवण्यात आलं.

यानंतर राजकारणात पडद्यामागून काम करणाऱ्या आणि उत्तराखंडच्या राजकारणापुरते सीमित असणाऱ्या कोश्यारींनी नवी इनिंग सुरु केली. मात्र त्यांनी केलेल्या अनेक वादग्रस्त वक्तव्यानं महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः ढवळून निघालं.

तर असा आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा हा राजकीय इतिहास.