TOD Marathi

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेस्को मैदानावर (MNS Chief Raj Thackeray At Nesco Ground) मुंबईतील गट अध्यक्षांच्या मेळाव्याला संबोधित केले. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या निशाणावर कोण असणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं होतं. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी काही काळापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्याचबरोबर भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. राज्यपाल पदावर बसले आहेत म्हणून मान राखतो नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमी नाही असं म्हणत राज्यपालांना थेट इशारा दिला. भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केली होती, त्या टीकेला उत्तर देत असताना सावरकरांवर टीका करण्याची राहुल गांधीची लायकी तरी आहे का? असं म्हणत राहुल गांधींचाही खरपूस शब्दात समाचार घेतला.

मनसेने केलेल्या आंदोलनांची पुस्तिका काढणार असून आपल्या आंदोलनाला चांगलं यश मिळालं आहे. मशिदीवरील भोंगे काही ठिकाणी उतरले नाहीत, अजून काही भोंगे असतील तर पोलीस तक्रार करायची असेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

गेल्या काही काळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Governor Bhagat Singh Koshyari, BJP Spokesperson Sudhanshu Trivedi) यांनी केलेली विधानं त्याचबरोबर राहुल गांधी यांचं वक्तव्य, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर सांगलेला दावा या सगळ्या मुद्द्यांवर राज ठाकरे यांनी भाष्य केलं. येत्या काळात महाराष्ट्रात विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. मुंबई महापालिकेच्याही निवडणुका आहेत, या पार्श्वभूमीवर “तुम्ही कामाला लागा, तुम्हाला महापालिका आणून द्यायची जबाबदारी माझी” असं आवाहन देखील राज ठाकरे यांनी गटाध्यक्षांना केलं आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठीही पक्ष पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं आहे.

राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे:

  • मशिदीवर भोंगे असतील तर पोलीस तक्रार करायची
  • काही ठिकाणी अजूनही भोंगे उतरवले नाहीत
  • महाराष्ट्रात अरे आलं तर कारे बोललंच पाहिजे
  • महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेरच्या राज्यात जात आहेत
  • आपल्या भूमिका लोकांपर्यंत नीट पोहोचल्या पाहिजेत
  • मनसेची आंदोलन बदनाम करण्याचे प्रयत्न केले गेले
  • मनसेची आंदोलनं देश फोडण्यासाठी नव्हती
  • उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तब्येतीचं कारण देत होते
  • कोश्यारींचं वय काय, ते बोलतायत काय?
  • राज्यपाल पदावर बसलाय म्हणून मान ठेवतोय, नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमी नाही
  • रेल्वेच्या आंदोलनामुळे हजारो तरुणांना नोकऱ्या मिळाल्या
  • उद्योगधंद्यांसाठी महाराष्ट्रापेक्षा सुपीक जमीन नाही
  • गुजराती मारवाड्यांना विचारा ते महाराष्ट्रात का आले?
  • राज्यपाल पदावर बसलेत म्हणून मान राखतो
  • सध्याचे तरुण राजकारण्यांकडून काय धडे घेतील?
  • महाराष्ट्रातील नोकऱ्या सोडून तरुण वर्ग बाहेर का जातोय?
  • राहुल गांधींचा मैसूर सॅंडल सोप असा उल्लेख
  • राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचे
  • हल्ली राहुल गांधी बोलतात की ओरडतात कळत नाही
  • दयेचा अर्ज ही सावरकरांची रणनीती होती
  • सावरकरांवर बोलण्याची राहुल गांधींची लायकी तरी आहे का?
  • महापुरुषांचा अपमान करणं काँग्रेस, भाजपने थांबवावं
  • नेहरू, गांधींना बदनाम करणं थांबवा
  • महापुरुषांची बदनामी करून हातात काय लागणार?
  • देशात महागाई, आरोग्य, सुरक्षेचे प्रश्न महत्त्वाचे
  • देशातील इतर विषय गांभीर्याने न घेता बदनामी सुरू
  • महापुरुषांची बदनामी आता बस्स झालंतुम्ही ताकदीने उतरा, राज ठाकरे महापालिका तुमच्या हातात आणून देणार
  • स्वतःभोवती गुजरे निर्माण करणारा पदाधिकारी नको