TOD Marathi

महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. (Election of new speaker of maharashtra assembly took place) भाजपकडून राहुल नार्वेकर, शिवसेनेकडून राजन साळवी निवडणूक लढवत होते. भाजप आणि एकनाथ शिंदे समर्थकांनी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar BJP) यांना मतदान केलं. भाजपचे राहुल नार्वेकर यांनी १६४ मत मिळवत विजय मिळवला. शिवसेना उमेदवार राजन साळवी (Rajan Salvi Shivsena) यांना १०७ मतं मिळाली. तर, एमआयएम आणि सपाच्या आमदारांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. शिवसेनेसाठी ही निवडणूक फार महत्त्वाची होती. शिवसेना आमदारांनी राजन साळवी यांना मतदान करावं, असा व्हीप शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी जारी केला होता. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांनी यावेळी शिवसेनेचा व्हीप मोडला हे रेकॉर्डवर यावं यासाठी सुनील प्रभू यांनी विधानसभा उपाध्यक्षांना पत्र दिलं होतं. मात्र, मतदानाच्या प्रक्रियेनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. थोरात यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे सेनेचं ते पत्र रेकॉर्डवर घेण्याची मागणी केली आणि ती मान्य झाली.

सपा आणि एमआयएमच्या आमदारांनी यावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यांचं मतदान संपल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात बोलायला उभे राहिले. बाळासाहेब थोरात यांनी मतदानाची प्रक्रिया अध्यक्षपदाकरीता सुरु आहे. अध्यक्ष महोदय यामध्ये शिवसेनेच्या गटनेत्यांनी आपल्या करता जे पत्र दिलंय त्याची वाचन करावं, त्याची नोंद घ्यावी ते रेकॉर्डवर घ्यावं, मागणी केली.

बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या मागणीप्रमाणं नरहरी झिरवाळ यांनी पुढील प्रक्रिया पार पडली. आज माझ्यासमोर महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्ष निवडीची कार्यवाही झाली. मतदानाच्या प्रक्रियेत शिवसेनेच्या सदस्यांनी पक्षाच्या आदेशाविरुद्ध जाऊन मतदान केले, असं माझ्या निदर्शनास आलं आहे. ही प्रक्रिया माझ्यासमोर झाली आहे. माझ्यासमोर मतदानाची प्रक्रिया झाली असून पुढील शिवसेना सदस्यांनी पक्षाच्या आदेशाविरोधात मतदान केल्याचं सिद्ध झालं आहे. या सर्वांचं पक्षाविरोधातील मतदान रेकॉर्डवर घेण्यात यावे आणि त्यांची नाव लिहिण्यात यावीत, या सर्वाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. हे रेकॉर्डवर घ्यावे, असे आदेश देत असल्याचं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज