TOD Marathi

मुंबई : 

मुंबई मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडांच्या कत्तलीनंतर तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडे वादग्रस्त ठरल्या होत्या. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सत्तेत येताच त्यांची उचलबांगडी केली होती. आता नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने मात्र मेट्रोपेक्षा सुपरफास्ट निर्णय घेत अश्विनी भिडे यांच्यावर पुन्हा एकदा मुंबई मेट्रोची धुरा सोपवली आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातो. (Ashvini Bhide appointed again as MD of Mumbai Metro)

मुंबई मेट्रो रेल्वेसाठी आरे कॉलनीमध्ये कारशेड उभारण्यासाठी शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली होती. भाजपची सत्ता असताना अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. मुंबई मेट्रोसाठी आरे कॉलनीत कारशेड उभारण्याबाबत मुंबईतील नागरिकांनी विरोधही केला होता. त्यासाठी आंदोलनही झाली. परंतु भिडे यांनी आंदोलनाची दखल न घेता झाडे तोडली होती. तेव्हा माजी आदित्य ठाकरे यांनी कारशेडसाठी आरेतील झाडे तोडण्याच्या अश्विनी भिडे यांच्या भूमिकेस विरोध केला होता. (Aaditya Thackeray opposed the role of Ashvini Bhide) आणि सत्ता येताच, भिडे यांची मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून उचलबांगडी केली होती. मात्र शिंदे-फडणवीसांनी सत्तेत येताच आरेमध्येच कारशेड उभारलं जाईल, असं ठासून सांगितलं.आणि पुन्हा अश्विनी भिडे यांच्यावर मुंबई मेट्रोची धुरा सोपवत ठाकरेंना धक्का दिला.

अश्विनी भिडे १९९५ च्या बॅचच्या आएएस अधिकारी आहेत. कार्यतत्पर अधिकारी म्हणून त्या ओळखल्या जातात. देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. कारशेडच्या मुद्द्यावरुन ठाकरे आणि अश्विनी भिडे यांच्यात मतभेद झाले होते. त्यानंतर त्यांना करोना विषाणू व्यवस्थापन समितीत सहभागी करुन घेण्यात आलं. तसेच नंतर २०२० साली त्यांना मुंबई महापालिकेचं अतिरिक्त आयुक्तपद देण्यात आलं होतं. (Ashvini Bhide was appointed as Additional Commissioner of Mumbai) मात्र आता फडणवीसांनी सत्तेत येताच अश्विनी भिडे यांच्यावर पुन्हा एकदा मुंबई मेट्रोची (Mumbai Metro) जबाबदारी देऊन शिवसेनेला धक्का दिला आहे.