TOD Marathi

नवी दिल्ली :

देशाच्या नव्या संसद भवनाच्या इमारतीवर 20 फूट उंच अशोक स्तंभाचं (National Emblem) अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलं. मात्र, मोदींनी अनावरण केलेल्या अशोक स्तंभावर सातत्याने टीका होत असून त्यात आता तृणमूल काँग्रसचे खासदार जवाहर सरकार (TMC MP Jawahar Sircar) यांचीही भर पडली आहे. (Ashok Stambh news)

जवाहर सरकार (Jawhar Sircar) यांनी म्हटलंय की, देशाचं राष्ट्रीय चिन्ह असलेल्या भव्य अशोकस्तंभाचा अवमान करण्यात आला आहे. त्यांनी ट्विटर एक फोटो शेअर केला असून त्यात आधीचा आणि नवीन अशोकस्तंभ दिसत आहे. ते पुढं म्हणतात की, मूळ डावीकडे आहे, जो सुंदर आहे आणि आत्मविश्वासाने उभा आहे. उजवीकडे मोदींनी अनावर केलेल्या अशोकस्तंभ आहे, जो की तिरस्कार, अनावश्यकपणे आक्रमक आणि विषम वाटतो. ट्विटमध्ये सरकार यांनी अशोकस्तंभ तातडीने बदलण्याची मागणी केली आहे.

याआधी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह (AAP MP Sanjay Singh) यांनी देखील अशाच प्रकारची टिका केली होती. ते म्हणाले होते की, ‘जुन्या अशोकस्तंभात सिंह गंभीर मुद्रेत आणि जबाबदार शासकासारखा दिसतोय तर, दुसर्‍यामध्ये (संसदेच्या इमारतीवर) तो मनुष्यभक्ष्य शासकाच्या भूमिकेत भीती पसरवण्यासारखा दिसत आहे.

या व्यतिरिक्त काँग्रेसने देखील अशोकस्तंभाच्या अनावरण सोहळ्यांना इतर पक्षांना आमंत्रित न करण्यावरून नाराजी व्यक्त केली आहे.