TOD Marathi

संजय राऊत (Sanjay Raut Shivsena) यांच्या अटकेनंतर मातोश्रीवर तातडीची बैठक होणार आहे. काल संजय राऊतांची चौकशी सुरू होती, त्यानंतर संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं, तेव्हा मातोश्री बाहेर तसेच संजय राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी मोठा गराडा घातला होता. तिथे संजय राऊत यांच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या जात होत्या. जवळपास 16-17 तासांच्या चौकशीनंतर रात्री एकच्या सुमारास संजय राऊतांना ईडीने अटक केली आहे.

शिवसेना नेते अनिल देसाई यांनी संजय राऊत यांच्या या अटकेवर प्रतिक्रिया दिलेली आहे. हा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, मात्र अशा प्रयत्नांमुळे आमचा आवाज हा थांबणार नाही, असं अनिल देसाई यांनी म्हटलेलं आहे. (Anil Desai on Sanjay Raut arrest)

गेल्या काही दिवसात ईडीने संजय राऊत यांना काहीवेळा समन्स पाठवले होते. त्यानंतर काल ईडीचं पथक संजय राऊत यांच्या घरी दाखल झालं होतं.