नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नवी दिल्लीतील इंटेलिजन्स ब्युरोच्या मुख्यालयात राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेच्या समारोप सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या नागरिकांच्या हत्यांवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलिस महासंचालक, गुप्तचर विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते त्याच सोबत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे महासंचालक देखील या बैठकीला उपस्थित होते. देशातील एकूण सुरक्षा परिस्थिती आणि काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या नागरिकांच्या हत्यांसह विविध कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली.
गृह मंत्रालयाच्या अधिकृत प्रवक्त्याने केलेल्या ट्विटनुसार, चर्चा तपशीलवार आणि विस्तृत होती. ट्वीटमध्ये म्हटले आहे की, अंतर्गत सुरक्षाविषयक विविध आव्हाने आणि त्यांना सामोरे जाण्याच्या मार्गांवर परिषदेत चर्चा करण्यात आली.