TOD Marathi

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या सतत चर्चेत आहे. आता सध्या त्याला नेटकरी चांगलेच ट्रॉल करत असल्याचे दिसत आहे. #भौंक_मत_कोहली अशा कॅपशन सोबत सोशल मिडियावर विराट कोहलीला ट्रॉल केलं जात आहे. विराटने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने दिवाळी साजरी करण्याच्या टिप्स सांगितल्या आहेत. मात्र हे कोणालाच आवडलं नसल्याचं या ट्रेंडवरून दिसतंय.

विराट कोहली त्या व्हिडीओमधून दिवाळी साजरी करण्याच्या टिप्स देत आहे, जगभरातील लोकांसाठी हे एक कठीण वर्ष होते, भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लोकांना कठीण काळाचा सामना करावा लागला. आता आपण सगळे दिवाळीची तयारी करत आहोत, मी तुमच्या बरोबर दिवाळी साजरी करण्याच्या टिप्स शेअर करतोय, असं तो त्या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे.

विराट कोहलीला नेटकऱ्यांनी त्याच्या बॅटिंगवर आणि वर्ल्डकपवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. फक्त दिवाळी सणालाच अशा टिप्स देत जाऊ नको. इतर सणांनाही अशा टिप्स देत चल, अशा तिरकस कमेंटही काही युजर्सने केल्या आहेत.