TOD Marathi

गाझियाबाद: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तारेवरची कसरत करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मतदारांना आपल्या बाजूने झूकवण्यासाठी जाहीर नाम्यांतून विविध घोषणा आणि आश्वासने दिली जात आहे. गाझियाबादमध्ये आज समाजवादी पक्षाचे नेते आणि आरएलडीचे राष्ट्रीय अध्यक्ष जयंत चौधरी यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केली होते. यात अखिलेश यादव यांनी भाजपावर जोरदार प्रहार केला.

भाजपा सरकारच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशचा विकास खुंटला असा आरोप त्यांनी आपल्या भाषणात केला. यामुळेच यूपीच्या जनतेने यावेळी भाजपा सरकार उलथवून टाकण्याचा निश्चय केला आहे असेही ते म्हटले. कोरोनाच्या काळात मजुरांना सहन कराव्या लागलेल्या हालअपेष्टांना भाजपाच जबाबदार आहे. मोदी सरकारमध्ये अन्नदाता देखील नाराज आहेत आणि ही निवडणूक मजूर व शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाला जोरदार प्रत्युत्तर मिळेल, असे अखिलेश यादव म्हणाले. तसेच उत्तर प्रदेश निवडणुकीच्यानंतर गुजरातमध्ये निवडणूका होणार आहेत आणि भाजपाला खरे सरप्राईज तिथेच मिळणार आहे. कारण भाजपा नकारात्मक राजकारणाचा द्योतक असल्याने गुजरात मध्ये भाजपाचा पराभव होणार, असेही अखिलेश यादव म्हणाले.