रत्नागिरी : शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे सध्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. रत्नागिरी विमानतळावर त्यांच्या स्वागताकरिता शिवसैनिक आणि सुरक्षारक्षकही उपस्थित होते. मात्र ठाकरे यांना झेड सुरक्षा असतानाही अशा प्रकारची कोणतीही व्यवस्था किंवा ताफा यावेळेस पाहायला मिळाला नाही. म्हणजे त्यांच्या ताब्यात काही खाजगी गाड्यांचाही समावेश होता.
प्राप्त माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत काटकसर झाल्याचं पाहायला मिळतंय. झेड सुरक्षा म्हणजे तसेच सुरक्षारक्षकांच्या गाड्यांचा ताफा. मात्र ठाकरे यांना चक्क खाजगी गाड्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ठाकरे समर्थक आणि शिवसैनिकांकडून यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली जात आहे.
यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, सुरक्षेची जबाबदारी सरकारची असते माझ्यासाठी शिवसैनिक पुरेसे आहेत”, अशा शब्दात त्यांनी सरकारवर बोचरी टीकाही केली आहे.