उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद (Press Conference of DCM Devendra Fadnavis) घेत महाराष्ट्र राज्यातून बाहेर गेलेल्या प्रकल्पांना महाविकास आघाडी सरकारच कशा पद्धतीने जबाबदार आहे, याचा पाढा वाचला. यासाठी विविध उदाहरणे आणि वृत्तपत्र कात्रण आणि बैठकांचे संदर्भही त्यांनी दिले. एकंदरीत सर्वच प्रकल्प राज्याबाहेर जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आणि त्यांचे धोरण कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray attacked CM and DCM in Press Conference) यांनी माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह पत्रकार परिषद घेत चांगलाच पलटवार केला.
राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी या विषयावर बोलायला हवे मात्र उपमुख्यमंत्री बोलतात याचा अर्थ खरे पॉवर कुणाकडे आहेत हे समजून घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री या विषयावर बोलायला तयार असतील तर मुख्यमंत्र्यांसोबत वन-टू-वन डिबेट करायला मी तयार आहे, (I am ready to do debate with CM, Says Aditya Thackeray) असं म्हणत एक प्रमुख कार्य मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं.
आदित्य ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे: