TOD Marathi

महाविकास आघाडी सरकारच्या अपयशामुळे महत्त्वाचे प्रकल्प राज्याबाहेर गेले मात्र महाविकास आघाडीचे नेते त्याचा खापर हे विद्यमान सरकारवर फोडत आहेत. या संदर्भातले कागदपत्र देखील त्यांनी यावेळी सादर केले. (DCM Devendra Fadnavis Press Conference) हे प्रकल्प आपल्या राज्यात राहिले पाहिजेत म्हणून महाविकास आघाडीने कुठलाही पत्रव्यवहार केंद्र सरकारशी केला नाही. याउलट काही महत्त्वाच्या व्यक्तींनी महाराष्ट्रातलं वातावरण उद्योगासाठी पोषक नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलं, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पुढच्या दोन वर्षात महाराष्ट्र हे क्रमांक एकचे राज्य असेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्वाधिक लक्ष महाराष्ट्राकडे दिलं आहे, असेही ते म्हणाले. आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यामध्ये असलेल्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. (Devendra Fadnavis on Bachhu Kadu and Ravi Rana controversy) माझ्या एका कॉलवर आमदार बच्चू कडू हे गुवाहाटीला गेले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारच्या काळात कशा पद्धतीने महत्त्वाचे प्रकल्प राज्य बाहेर गेले, याबद्दलची माहिती दिली. यामध्ये वेगवेगळ्या लोकांशी त्यांच्या झालेल्या भेटीगाठी, त्यांनी या प्रकल्पांबद्दल व्यक्त केलेली मत याही विषयावर देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे: 

  • उद्योजक दूर जावेत हे विरोधकांचे षडयंत्र!
  • फॉक्सकॉनबाबत सेनेच्या नेत्यांनी पाठवलेलं एक पत्र दाखवावं?
  • मी पुरावे दिलेत, त्यांच्याकडे काहीच नाही
  • सत्ता गेल्यापासून विरोधकांच्या मनावर परिणाम
  • गुंतवणुकीचा बाप म्हणजे रिफायनरी
  • मोदी पंतप्रधान झाल्यानंतर केंद्राचा सर्वाधिक पैसा महाराष्ट्रात
  • कुठलाही प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार
  • सॅफ्रन प्रकल्प 2021 मध्येच हैदराबादला
  • महाराष्ट्राला दोन वर्षात नंबर वन वर आणू
  • उद्योजक दूर जावेत हे विरोधकांचे षडयंत्र!