TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 22 मे 2021 – बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिचा बॉडीगार्ड कुमार हेगडे यांच्यावर मुंबई पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. मुंबईच्या डी. एन. नगर पोलीस ठाण्यामध्ये एका 30 वर्षीय ब्युटीशियन महिलेने कुमार हेगडे विरुद्ध बलात्कार केल्याची तक्रार दिली आहे.

तसेच कुमार हेगडे याने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला आहे, असे तक्रारमध्ये म्हंटले आहे.

या महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मागील जूनमध्ये एका फिल्म शुटींग दरम्यान कुमार हेगडेची भेट झालीय. प्रत्यक्षात ही महिला आठ वर्षापूर्वी कुमार हेगडे यांच्या संपर्कामध्ये आली होती. पण, जूनमध्ये भेट झाल्यावर त्याने तिला लग्नाची मागणी घातली.

तसेच शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. आणि नंतर आई आजारी आहे, तिला भेटायला जातो, असे सांगून आणि या महिलेकडून ५० हजार रुपये घेऊन हेगडे गेलाय. तेव्हापासून कुमार हेगडे या महिलेला भेटलेला नाही.

या संदर्भात कंगना राणावतच्या टीम बरोबर संपर्क केला, तेव्हा कुमार हेगडे गेले. कित्येक दिवस सुट्टीवर गेला असून त्याच्याशी कोणताच संपर्क राहिलेला नाही, असे सांगण्यात आले आहे, असे समजते.