शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी घेतलेली बंडाची भूमिका ही अधिक तीव्र होताना दिसत आहे. काल एकनाथ शिंदे हे काही आमदारांसह गुजरातमध्ये असल्याचे वृत्त होतं. मात्र त्यानंतर आमदारांची संख्या वाढत गेली. मध्यरात्री ते गुवाहाटीत दाखल झाले. सुरुवातीला अकरा नंतर पंधरा, वीस, तीस ही संख्या वाढत जाऊन आता एकनाथ शिंदे यांच्या समवेत एकूण 50 च्या आसपास आमदारांचे संख्याबळ असल्याचं म्हटलं जात आहे. (Ekanath Shinde in Guvahati)
काल संजय राऊत यांनी आमदारांचं अपहरण करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला होता. आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांच्याशी माझं बोलणं झालं आहे, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं होतं. त्यासोबतच लवकरच एकनाथ शिंदे परत येतील, आमचे सर्व आमदार परत येतील अशी देखील बातमी स्वतः संजय राऊत यांनी दिले होते. (Sanjay Raut tweeted about Maharashtra assembly)
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने..
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 22, 2022
आमदार संजय राऊत यांनी काही मिनिटांपूर्वी एक अत्यंत महत्त्वाचं ट्विट केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी या क्षणाची ही घडामोड आहे. महाराष्ट्र विधानसभेचा प्रवास बरखास्तीच्या दिशेने होत आहे असा महत्त्वपूर्ण ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेने भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन करावे अशी भूमिका घेतल्याचे वृत्त काल माध्यमांमध्ये होतं. काल एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक हे दोन नेते देखील गेले होते. (Milind Narvekar and Ravindra Fatak met Ekanath Shinde yesterday) जवळपास तासभर चर्चा त्यांच्यामध्ये झाली होती. हे सगळं झाल्यानंतर संजय राऊत यांचं हे ट्विट बरच काही बोलून जात आहे. आणि अनेक प्रश्न देखील उपस्थित होत आहेत.
या ट्विटमुळे आता महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होतील का? मध्यावधी निवडणुका टाळायच्या असतील तर कोण कोणासोबत सरकार बनवेल?किंवा एकनाथ शिंदे जसं म्हणत आहेत त्याला उद्धव ठाकरे मान्यता देतील का? असे एक ना अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. (Will uddhav thackeray agree with ekanath shinde?)