TOD Marathi

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या प्रचंड मोठ्या पेचात पडले आहेत. एकनाथ शिंदे यांचं बंड कुठल्याही परिस्थितीत शमण्याचं नाव घेत नाही आहे. अशातच भाजपसोबत कुठल्याही परिस्थितीत सत्ता स्थापन केली पाहिजे असं एकनाथ शिंदे म्हणत आहेत. मात्र असं केल्यास आणखी वेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. (Ekanath Shinde shivsena)

त्यामुळे आता आधी सरकार सांभाळायचं की पक्ष सांभाळायचा असा मोठा पेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर आहे. यापूर्वीही शिवसेनेत अनेक मोठे बंड झाले मात्र त्या लोकांनी थेट पक्ष सोडला होता. एकनाथ शिंदे यांनी पक्ष सोडलेला नाही तर त्यांनी आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत अशा आशयाचे ट्विट काल केलं होतं. (Yesterday Ekanath Shinde tweeted)

गेली अडीच वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचं नेतृत्व करत आहेत. हे नेतृत्व करत असताना भाजपवर टीका करण्याच्या करण्याची एकही संधी मुख्यमंत्र्यांनी सोडली नाही तर भाजपच्या वतीनेही देवेंद्र फडणवीस आणि अन्य नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जातील का? शिवसेना देवेंद्र फडणवीस किंवा भाजप यांच्या सोबत गेली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत अडीच वर्ष सत्तेत होते, त्यांना कसं मॅनेज करणार अशी अनेक प्रश्न उद्धव ठाकरे यांच्यासमोर उद्भवतील आणि त्यामुळे पक्ष की सरकार असा मोठा पेच उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे आता ही कोंडी कशी फोडली जाते हे बघणं उत्सुकतेचं असणार आहे.