TOD Marathi

शिवसेनेचा आज ५६ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. या कार्यक्रमात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीवर (MLC Election Maharashtra 2022) भाष्य केलय आणि विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘मला उद्याच्या निवडणुकीची चिंता नाही. चिंता करत बसलो तर शिवसेनाप्रमुखांनी माझ्या धमण्यांमध्ये जे भिनवलेलं आहे, त्याचा उपयोग काय? हार-जीत होत असते आणि उद्या तर आपण जिंकणारच आहोत,’ असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी बोलताना व्यक्त केला आहे. (uddhav Thackeray speech)

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर झालेल्या शिवसेनेच्या पराभवावरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. ‘राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचं एकही मत फुटलेलं नाही. मग नेमकं कोणाचं मत फुटलं त्याचा अंदाज आम्हाला आला आहे. कोणी काय कलाकारी केली आहे, याचा हळूहळू उलगडा होणार आहे. उद्याच्या निवडणुकीत कोणतीच फाटाफूट होणार नाही, कारण शिवसेनेत आता कोणीही गद्दार राहिलेला नाही,’ असंही ते म्हणाले.

‘महाराष्ट्र पेटत नाही, मात्र जेव्हा पेटतो तेव्हा समोरच्याला जाळून टाकतो. हिंदुस्थानावरचा हिरवा वरवंटा महाराजांनी काढला, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. सचिन अहिर चांगलं काम करत आहेत. आमशा पाडवी विधानसभा निवडणुकीत १३०० मतांनी पडले. पाडवी हा आदिवासींचा हक्काचा माणूस आहे. तर संपर्कप्रमुख म्हणून सचिन अहिरांचे काम चांगले,’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपल्या विधान परिषदेच्या दोन्ही उमेदवारांचा कौतुक केलं. (Uddhav Thackeray appreciates Sachin Ahir and Amsha Padvi)