पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची (Ayodhya Tour) जय्यत तयारी करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे 10 जुनला अयोध्येला जाणार होते मात्र राज्यसभा निवडणुकीत मतदान आणि अन्य कारणांमुळे ते आज अयोध्या दौऱ्यावर आहेत.
लखनऊ विमानतळावर आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात अयोध्येत दाखल होणार आहेत. अयोध्या दौरा हा राजकीय नाही तर श्रद्धेचा विषय आहे. रामललाचं दर्शन घेण्यासाठी आलोय. ही रामराज्याची भूमी राजकारणाची नव्हे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
संपूर्ण राज्याचे या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, या अयोध्या दौऱ्यासाठी राज्यभरातून हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. शिवसैनिकांनी अयोध्येत आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी जोरदार घोषणाबाजी केली आहे. विविध ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे फलक लावलेले आहेत.
आदित्य ठाकरे यांच्यासोबत या दौऱ्यात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील. दौऱ्याच्या काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत, मंत्री एकनाथ शिंदे (Minister Ekknath Shinde) यांनी या दौऱ्याचा तयारी आढावा घेतला होता. आज आदित्य ठाकरेंच्या हस्ते महाआरती, तयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे बडे नेते शरयू नदी किनारी दाखल झाले आहेत.