TOD Marathi

नवी दिल्ली:
कुत्र्याला फिरवण्यासाठी दिल्लीतील मैदानातून खेळाडूंना बाहेर काढणाऱ्या IAS अधिकाऱ्याला चांगली अद्दल घडली आहे. केंद्र सरकारकडून या गोष्टीची दखल घेत अधिकाऱ्याची थेट लडाखमध्ये रवानगी करण्यात आली आहे. तर त्याच्या पत्नीची बदली अरूणाचल प्रदेशात करण्यात आली आहे. आयएएस अधिकारी संजीव खिरवार हे दिल्लीत प्रमुख सचिवपदावर कार्यरत आहेत. काही दिवसांपासून संध्याकाळ होताच खिरवार हे त्यागराज स्टेडियममध्ये जायचे आणि संपूर्ण मैदानाचा ताबा घ्यायचे. खिरवार मैदानात येताच खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना बाहेर पाठवले जायचे.

ही बातमी समोर आल्यानंतर संजीव खिरवार यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने या घटनेची दखल घेत अहवाल मागवला होता. त्यानुसार मुख्य सचिवांनी गुरुवारी संध्याकाळी यासंबंधीचा अहवाल गृहखात्याला सोपवला. त्यानंतर संजीव खिरवार यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचे अनेकजणांनी कौतुक केले आहे. या घटनेनंतर आता त्यागराज स्टेडिअमच्या सुरु ठेवण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. आता हे स्टेडिअम रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहील.

दिल्लीच्या त्यागराज स्टेडिअममध्ये यापूर्वी ८ ते ८.३० पर्यंत सराव केला जायचा. पण गेल्या काही दिवसांपासून संध्याकाळी ७ वाजताच खेळाडू आणि प्रशिक्षकांना मैदानाबाहेर पाठवले जात होते. कारण संजीव खिरवार यांना त्यांच्या श्वानाला मैदानात फिरवायचे असते. यामुळे आमच्या सरावावर परिणाम होतो. गेल्या सातपैकी तीन दिवस संध्याकळी ६.३० ला सुरक्षा रक्षक सर्वांना मैदान रिकामे करण्यास सांगतात, अशी व्यथा येथील खेळाडूंनी मांडली होती

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज