TOD Marathi

मीठ असल्याचं सांगत इराणमधून गुजरातच्या मुंद्रा बंदरावर आणलेलं 500 कोटींचं कोकेन ड्रग्ज महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) जप्त केलं आहे. सुमारे 52 किलो असलेलं हे कोकेन असून याची किंमत जवळपास 500 कोटी इतकी आहे.

डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, ज्या मालवाहू जहाजावरून कोकेन जप्त करण्यात आले त्यात 25 मेट्रिक टनाच्या 1 हजार मिठाच्या बॅग्ज आहेत असा दावा करण्यात आला होता. मात्र, DRI ने 24 ते 26 मे या कालावधीत केलेल्या तपासणीत मालवाहू जहाजात 52 किलो कोकेन सापडलं.

कच्छ जिल्ह्यातील कांडला बंदराजवळील कंटेनर स्टेशनवर छाप्यादरम्यान डीआरआयच्या पथकाने महिनाभरापूर्वी 1300 कोटींचे 260 किलो हेरॉईन (Cocaine) जप्त केले होते.