TOD Marathi

मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती कुटुंब असणाऱ्या टाटा कुटुंबाची कहाणी आता लवकरच रुपेरी पडद्यावर दाखवली जाणार आहे. टाटा समूहाची स्थापना जमशेदजी नसरवानजी टाटा यांनी 1868 मध्ये केली होती आणि तेव्हापासून टाटा समूह देशाच्या विकासात योगदान देत आहे. आता लवकरच या समूहाची गोष्ट बिग स्क्रीनवर पाहता येणार आहे.

टी-सीरिजकडून हा नवा प्रोजेक्ट प्रेक्षकांसाठी आणला जात आहे. टी-सीरिजनचं इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. पोस्टमध्ये लिहिलंय की, ‘T-Series आणि Almighty Motion Picture हे या उत्तम  कुटुंबाची कथा तुमच्या समोर मांडण्यासाठी सज्ज आहेत.

गिरीश कुबेर यांच्या “द टाटा: हाऊ अ फॅमिली बिल्ड्स अ बिझनेस अँड अ नेशन” या कादंबरीमध्ये केवळ रतन टाटा यांच्याबद्दलच नाही तर टाटा कुटुंबातील प्रत्येक पिढीची माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकावर आधारित चित्रपट निर्मित केला जाणार आहे.