मुंबई : इन्फोसिस बोर्डानं रविवारी सलील पारेख यांची ५ वर्षांच्या कालावधीसाठी मुख्य कार्यकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलाय. पारेख यांचा नवीन कार्यकाळ १ जुलै २०२२ ते ३१ मार्च २०२७ पर्यंत असणार असल्याचं, कंपनीनं शेअर बाजाराला कळवलं आहे. हा निर्णय भागधारकांच्या मान्यतेने घेण्यात आला आहे.
इन्फोसिसन आपल्या निवेदनात म्हटलं की “हे लक्षात घेतले पाहिजे की सलील पारेख यांचा संचालक मंडळाच्या कोणत्याही सदस्याशी संबंध नाही. आणि स्टॉक एक्सचेंजने वेळोवेळी कायद्यांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुनर्नियुक्तीसाठी सर्व निकषांची पूर्तता केली आहे.
पारेख जानेवारी २०१८ पासून इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी आहेत व गेल्या ४ वर्षांपासून त्यांनी कंपनीचे यशस्वीपणे नेतृत्व केले आहे. त्यांच्याकडे IT सेवा उद्योगातील तीस वर्षांपेक्षा जास्त जागतिक अनुभव आहे.