मुंबई: समीर वानखेडे आंबेडकरांचा अनुयायी आहे. तो उच्चशिक्षित, चांगला अधिकारी, त्याला बदनाम करण्याचं काम सुरु आहे असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केले आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत सासरे ज्ञानदेव वानखेडीही होते.
यावेळी रामदास आठवले म्हणाले, क्रांती रेडकरने मला सगळी कागदपत्रे दाखवली. समीर वानखेडे यांनी मुस्लिम मुलीशी लग्न केलं हे खरंय पण ते जन्माने दलित आहेत. समीर आणि क्रांतीचं लग्न २०१६ मध्ये झाले आहे. नवाब मलिकांकडून वानखेडे यांच्याविरोधात जाण्याचे कारण मलिकांचा जावई आहे.
यावेळी क्रांती रेडकर यांचे सासरे ज्ञानदेव वानखेडे म्हणाले, मी धर्मांतर करणार नाही. मी सर्व कागदपत्रे सादर करणार आहे. मलिकांचे सर्व आरोप खोटे आहेत. मलिकांनी आमची बदनामी थांबवावी असे ज्ञानदेव वानखेडे यावेळी म्हणाले.