नवी दिल्ली: कोरोना महामारीविरुद्ध भारत आज एक मोठी कामगिरी आहे. भारतातील लसीकरणाचा आकडा आज १०० कोटी टप्पा पार करणार आहे आणि हा विक्रम आज देशभरात साजरा करण्यात येणार आहे. आतापर्यंत फक्त चीनने १०० कोटींहून अधिक लसीकरण केले आहे. मात्र आता यात भारताची देखील भर पडणार आहे.
आतापर्यंत १८ वर्षांवरील ७५ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ३१ टक्क्यांहून अधिक लोकांचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. देशात १८ ते ४४ वयोगटातील ५५,२९,४४,०२१, ४५ ते ५९ वयोगटातील २६,८७,६५,११० आणि ६० वर्षांवरील १६,९८,२४,३०८ लोकांचे देशात लसीकरण करण्यात आले आहे.
देश वैक्सीन शतक बनाने के करीब है।
इस स्वर्णिम अवसर के सहभागी बनने के लिए देशवासियों से मेरी अपील है कि जिनका वैक्सीनेशन बाकी है वो तत्काल टीका लगवाकर, भारत की इस ऐतिहासिक स्वर्णिम टीकाकरण यात्रा में अपना योगदान दें।
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) October 20, 2021
या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी लसीकरण करून भारताच्या ऐतिहासिक लसीकरण मोहिमेत योगदान देण्याचे आवाहन केले आहे. देश लसीचे शतक बनवण्याच्या जवळ आहे. या सुवर्ण संधीचा एक भाग होण्यासाठी, मी देशवासियांना आवाहन करतो की ज्यांना अद्याप लसीकरण करणे बाकी आहे त्यांनी त्वरित लसीकरण करून भारताच्या या ऐतिहासिक सुवर्ण लसीकरण प्रवासात योगदान द्यावे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.