TOD Marathi

वॉशिंगटन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतःचं सोशल मीडिया नेटवर्क सुरू करणार आहेत. ट्रम्प यांनी बुधवारी यासंदर्भातील काही योजनांची घोषणा केली. ‘ट्रुथ सोशल’ असे ट्रम्प यांच्या मीडिया नेटवर्कचे नाव असेल.

पुढच्या महिन्यात या नेटवर्कचा बीटा लॉंच करण्यात येणार आहे आणि काही ठराविक लोकांसाठी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. अॅपलच्या अॅप स्टोअरमध्ये हे प्री-ऑर्डरसाठी आधीच उपलब्ध आहे, असं टीएमटीजी ग्रुपने एका निवेदनात म्हटलंय.

डोनाल्ड ट्रम्प यांनी निवेदनात म्हटले आहे की, मी मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या अत्याचाराविरोधात उभं राहण्यासाठी ट्रम्प मीडिया आणि तंत्रज्ञान आणि ट्रुथ सोशल सुरू करत आहे. ट्रम्प पुढे म्हणाले की, आपण एखा अशा जगात राहतोय जिथे तालिबानी ट्विटर वापरू शकतात, मात्र सर्वांच्या आवडत्या माजी अमेरिकन अध्यक्षावर बंदी घालण्यात आली आहे. असं म्हणत त्यांनी तालिबानवर टीका देखील केली आहे.