मोठी बातमी! एनसीबीचं पथक आता थेट शाहरुखच्या घरी!

Shahrukh Khan - NCB - TOD Marathi

मुंबई: एनसीबीकडून मुंबईत वांद्रे, अंधेरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. यादरम्यान एनसीबीचं एक पथक शाहरुख खानच्या घरी मन्नतवर पोहोचलं आहे. आर्यन खानला जामीन मिळाली नाही आणि त्यात आज सकाळी शाहरुख खान आपल्या मुलाला भेटायला थेट आर्थर रोड जेलमध्ये गेला होता.

बुधवारी अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला. दरम्यान आर्यन खानच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता एनसीबीचे पथक बॉलीवूडच्या मागे का लागले आहे अशी चर्चा सुरू सर्वत्र सुरू आहे.

शाहरुख खान सकाळी आर्थर रोड तुरुंगात पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत सुरक्षारक्षक उपस्थित होते. मात्र त्यांना जेलच्या बाहेरच थांबवण्यात आलं. २ ऑक्टोबरला आर्यन खानला अटक करण्यात आली असून त्यानंतर पहिल्यांदाच शाहरुख खान आपला मुलगा आर्यन खानला भेटला.

Please follow and like us: