मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस पक्ष हेडलेस झाला आहे. त्याचा भाजप फायदा घेत आहे. त्यामुळे काँग्रेसने अध्यक्षपदाचा विषय मार्गी लावावा, असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सल्ला दिला
पत्रकारांशी संवाद साधत असताना ते म्हणाले, काँग्रेस पक्षाला कोणी अध्यक्ष नियुक्त केला जात नाही, तोपर्यंत आज जो काही गोंधळ सुरू आहे तो थांबणार नाही असं माझ्यासारख्या राजकीय विश्लेषकाला वाटतं. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर काँग्रेस हेडलेस, नेतृत्वहीन झाली आहे. याच कारणामुळे भाजप याचा फायदा घेत असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.
देशात कॉंग्रेस पक्ष मोठा आहे आणि भविष्यात राजकारण करताना काँग्रेस शिवाय राजकारण करता येणार नाही. पण काँग्रेस नेतृत्वाने अध्यक्षपदाचा विषय लवकरात लवकर मार्गी लावला तर विरोधी पक्षाच्या आघाडीला पुढे जाता येईल, असंही यावेळी राऊत म्हणाले.