टिओडी मराठी, दि. 5 सप्टेंबर 2021 – शरीरातील लोहाची कमतरता निर्माण झाल्यास एनिमियासारखा अर्थात रक्तक्षय आजार होतो. मात्र, सामान्य दिसणाऱ्या या आजारावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर हा आजार गंभीर होतो. त्यामुळे शरिरातील लोहाची कमतरता भरुन काढण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा हे जाणून घेऊया…
ब्रोकोली –
सुमारे दीडशे ग्रॅम ब्रोकोलीमध्ये एक मिलिग्राम लोह असते. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी याचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे याचा आहारात समावेश करावा.
पालक –
सुमारे 100 ग्रॅम पालकमध्ये अंदाजे 2.7 मिलिग्राम लोह असते. याच्या सेवनामुळे शरिराला आवश्यक लोह मिळते.
दाळ –
दाळीचे वरण, विविध भाज्यांत त्याचा वापर हे आपल्याकडे दररोजच पहायला मिळते. जीवनसत्वं, लोह, अँटी-ऑक्सिडंट तत्वे असणाऱ्या डाळीला म्हणून सूपर फूड असेही म्हटले जाते. 200 ग्रॅम दाळीच्या वरणात अंदाजे 6.6 ग्रॅम लोह असते.
गुळ-शेंगदाणे –
प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध असणारा गुळ आणि शेंगदाणे खावूनही शरिरातील लोहाची कमतरता भरून काढता येते. आयुर्वेदात गुळाला औषधीय शर्करा म्हणून संबोधले जाते. गुळ लोहवर्धक असून शरिरात उर्जा निर्माण करतो.
खजूर –
काळा आणि लाल अशा दोन स्वरूपात बाजारात खजूर उपलब्ध असतात. खजूर हे लोहप्रमाणेच ‘व्हिटामिन सी’ आणि ‘व्हिटामिन बी’ वाढवण्यास मदत करते. खजुराच्या सेवनाने लाल रक्तपेशींची निर्मिती वाढते आणि परिणामी हिमोग्लोबिन वाढते.
मांसाहार –
शाकाहाराबरोबरीने मांसाहाराने हि शरिरातील लोहाचे प्रमाण वाढवता येते. लाल मांसामध्ये याचे प्रमाण जास्त असते. 100 ग्रॅम लाल मांसातून 2.7 मिलिग्राम लोह शरिराला मिळते. तसेच ट्यूना जातीच्या माशाच्या 85 ग्रॅम तुकड्यातून 1.4 मिलिग्राम लोह मिळते.