टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 27 ऑगस्ट 2021 – जर तुम्हाला काही बँकेची कामं करायची असतील तर आजच करा. कारण, उद्यापासून 4 दिवस बँक बंद असणार आहेत. आरबीआयने या आठवड्यात बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सलग 4 दिवसांची सुट्टी आहे. त्यामुळे पुढील 4 दिवस बँका बंद असणार आहेत.
बँकेला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. 28 ऑगस्टला महिन्यातील चौथा शनिवार आहे, त्यामुळे बँक बंद असणार आहे. तर त्यानंतर 29 तारखेला रविवारी असल्याने सर्वत्र बँका बंद असतील, या दिवशी साप्ताहिक सुट्टी असणार आहे. तर 30 ऑगस्टला कृष्ण जयंती असल्यामुळे 30 तारखेला देखील बँका बंद असतील.
कृष्ण जयंती असल्याने अहमदाबाद, चेन्नई, देहरादून, जयपूर, जम्मू , कानपूर, लखनऊ, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर, गंगटोक आणि चंदीगड याठिकाणच्या बँका 30 तारखेला बंद असणार आहेत. तर, काही ठिकाणी 31 तारखेला कृष्ण जयंती साजरी केली जातेय. त्यामुळे काही ठिकाणी 31 तारखेला सुट्टी असणार आहे.
4 दिवस बँका जरी बंद असल्या तरी ऑनलाईन बँकिंग सेवा सुरू राहणार आहेत. त्यासह एटीएम सेवाही सुरू करणार असणार आहे. त्यामुळे लोकांना आर्थिक व्यवहार करण्यास लोकांना अडचणी नाहीत.