TOD Marathi

टिओडी मराठी, सिंधुदुर्ग, दि. 27 ऑगस्ट 2021 – महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे कुटुंब आणि शिवसेना यांच्यात वाद पेटल्याचे दिसत आहे. त्यात आजच्या शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक ‘सामना’मधून शिवसेनेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर काही आरोप केलात. त्याच आरोपांना आता भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सिंधुदुर्गामध्ये श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे यांना जेवणावरून, भरसंसारातून कायमचे कोणी उठवले? याचा नव्याने तपास ‘ठाकरे’ सरकारने करावा, अशी मागणी शिवसेनेने केल्यानंतर नितेश राणे यांनी म्हटले आहे की, चांगली गोष्ट आहे, लवकर तपास करावा. संजय राऊत येवढा उशीर का लावतात? हे आम्हालाच कळले नाही. 2014 पासून शिवसेना सत्तेत आहे. 2014 ते 19 दीपक केसरकर गृहमंत्री होते. आता पण शिवसेना सत्तेमध्ये आहे.

खासदार संजय राऊत ज्यांची चमचेगिरी करतात. त्या पवार साहेबांकडे गृहखातं आहे. त्यामुळे मला कळत नाही की ते ‘सामना’मधून असे का? आव्हान देत आहेत. त्यांच्याकडे राज्याची सत्ता आहे. त्यांनी तपास करावा. मला हरकत नाही, असे नितेश राणे म्हणालेत.

यावेळी नितेश राणे म्हणाले, त्यासह मला संजय राऊत यांना ही विनंती करायची आहे. तुम्ही या सर्व केसेस उघडताना जरा नंदकिशोर चतुर्वेदी हे गेल्या 4 महिन्यापासून का गायब आहेत?, याची पण चौकशी झाली पाहिजे. राज्यात काही लोक गायब होताहेत. त्यात नंदकिशोर चतुर्वेदी आहेत. ते कोणाचे पार्टनर आहेत. 2019 मध्ये आताच्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील कुठल्या मंत्र्यांचे पार्टनर होते. या सर्वांची चौकशी संजय राऊत यांनी केली तर त्याही कुटुंबाला थोडा आधार भेटेल.

नितेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनाई आदेश असो किंवा अडचणी आणण्याचे काम मुंबईपासून सुरूय. हे काय आमच्यासाठी नवीन नाही. ज्या पद्धतीने राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला फार डोकेदुखी झाली. आम्हाला जे काही करायचे ते उद्या करू. मात्र उद्यापासून सुरू होणारी जन आशीर्वाद यात्रेतील उत्साहामध्ये कुठेही कमी होणार नाही. त्याच ताकतीने व उत्साहाने नारायण राणेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वागत करणार आहोत.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज