टिओडी मराठी, मुंबई दि. 25 ऑगस्ट 2021 – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द बोलले होते. त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. नारायण राणे यांना काल अटक आणि जामिनही मिळाला आहे. मात्र, हा वाद मिटलेला नाही. आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून आपल्या जीवाला धोका आहे, असे म्हंटलं आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी केलेल्या विधानावर आक्षेप घेतला आहे.
आमदार प्रसाद लाड पत्रात म्हणाले, जन आशीर्वाद यात्रेचा प्रमुख म्हणून मी नारायण राणे यांच्यासोबत होतो. पोलिसांकडून नारायण राणेंना जी वागणूक मिळाली, तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. पण, जेव्हा पोलिसांची त्यांच्याशी वागण्याची पद्धत बदलली. मी पोलिसांकडे कागदपत्रं मागितली होती. पण, ते देऊ शकले नाहीत. राणेंविरुद्ध कारवाई जी त्यांच्या डोक्यात होती, ती ते करू शकले नाहीत.
संपूर्ण प्रकरण झाल्यानंतर मध्यरात्री २ वाजनंतर आपल्याला धमक्यांचे फोन आले. यापैकी काही फोन मराठीत तर काही हिंदीत होते. आपल्या शिवीगाळ केली. ठार मारण्याच्या, घर आणि ऑफीस जाळून टाकण्याच्या धमक्या दिल्या. आपण या धमक्यांना घाबरत नाही. तरीही विधानपरिषदेचा आमदार म्हणून मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांना पत्र दिलंय. माझ्या जीवाला काही झालं तर त्याला शासन जबाबदार असेल, असे प्रसाद लाड यांनी सांगितलं.