TOD Marathi

टिओडी मराठी, बीड, दि. 21 ऑगस्ट 2021 – नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन केले होते. पण, कोरोनाच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अनेक मराठा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केलेत. त्यामुळे, गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा, असे म्हणत छत्रपती संभाजीराजे यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

नांदेडमध्ये मराठा मूक आंदोलनप्रकरणी 21 जणांवर गुन्हे दाखल केलेत. कोरोना काळात गर्दी जमवून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि कोविड नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी आयोजकांवर वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केलेत.

कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्यामुळे संभाजीराजे संतापले आहेत. जर तुम्हाला गुन्हे दाखल करायचे असेल तर माझ्यावर करा, सामान्य गरिब मराठा बांधवांवर गुन्हा दाखल का करताय ? असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थितीत केला आहे.

समाजाच्या प्रश्नांसाठी नांदेड इथे एकत्र आलेल्या मराठा बांधवांवर प्रशासनाने कोरोनाचे कारण देत गुन्हे दाखल केलेत. राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय असे का?, असा देखील सवालही संभाजीराजे यांनी उपस्थितीत केला आहे.

नांदेड मराठा क्रांती मुक आंदोलकांच्या पाठीशी छत्रपती संभाजीराजे ठामपणे उभे आहेत. शुक्रवारी मराठा क्रांती मूक आंदोलन नांदेड इथे छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडले.

यावेळी मराठा समाजाने खदखद दाखविण्यासाठी हजारोंच्या संख्येची एकी दाखवली आहे. आरक्षणासह इतर प्रश्न सोडविण्यासाठी मराठा बांधव छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक होताना दिसत आहेत.

एकीकडे सर्व राजकीय पक्षांचे सभा, मेळावे, आंदोलन होत आहेत, अशावेळी मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांवर गुन्हा दाखल झाल्याने संभाजीराजे यांनी Tweet च्या माध्यमातून नाराजी व्यक्त केलीय.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज